+91-2569-250159     navapuracs@gmail.com
                                          contact@acscnavapur.ac.in

Important Notice

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व दिव्यांग/अपंग बांधवांना व भगीनींना ५ टक्के सेस निधीतून विविध प्रकारचे स्वयंरोजगारासाठी शंभर टक्के अनुदान तत्वावर (परतफेड करण्याची गरज नाही.) अर्थ सहाय्य देणेत येणार आहे.

?? ऐक बनो नेक बनो ??

महत्त्वपूर्ण माहिती देत आहे.

जिल्हा परिषद नंदुरबार, समाज कल्याण विभाग नंदुरबार, उपमुख्यकार्यकारी अधि. चे पत्र – जावक क्रमांक – ८८५ / दिनांक – २६/०७/२०२३ च्या नुसार.

यांच्याकडून कळविण्यात येते आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व दिव्यांग/अपंग बांधवांना व भगीनींना ५ टक्के सेस निधीतून विविध प्रकारचे स्वयंरोजगारासाठी शंभर टक्के अनुदान तत्वावर (परतफेड करण्याची गरज नाही.) अर्थ सहाय्य देणेत येणार आहे.
त्यात व्हेडींग स्टाॅल, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, मिर्ची कांडप यंत्र, फुडप्रोसेसिंग युनिट, झेरॉक्स मशीन, जनरल स्टोअर्सचे, किराणा दुकान इत्यादी.
तसेच शेतकरी दिव्यांग बांधवांना शेती विषयक औजारे, मोटार पंप, विहिरी खोदणे, गाळ काढणे, पाईप लाईन करणे, मळणी यंत्र, ठिबक सिंचन व बि – बियाणेसाठी अर्थ सहाय्य करणे, व शेतीपूरक व्यवसायासाठी म्हणजे शेळी पालन, कुकुट पालन , वराह पालन, मच्छी पालन व दुग्ध व्यवसाय इत्यादींसाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.
तरी नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी व भगीनींनी दिनांक ३१ आॅगष्ट २०२३ या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करावेत.

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावेत.

१) आँनलाईन अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
२) रहिवासी दाखला – (ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा.)
३) उत्पन्नाचा दाखला. (४८०००/- हजार रुपयेच्या आतील.)
४) आधार कार्ड.
५) रेशनकार्ड.
६) एक पासपोर्ट साईज फोटो.
७) १००/- रुपयेचा स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, त्यात समाज कल्याण विभाग नंदुरबार यांच्या कडून मी कोणत्याही प्रकारच्या योजनांचे लाभ घेलेला नाही असे वेंडरकडून लिहून घेणे व हे प्रतिज्ञापत्र फार्मला जोडणे .
तरी आपण आपले अर्ज त्वरीत आपल्या तालूक्यातील पंचायत समितीच्या टपाल विभागात जमा करावेत व पाठपुराव्यासाठी पोच घ्यावी. किंवा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद – नंदुरबार, अपंग विभागात येथे जमा केले तरी चालतील.

टिप :- सोबत या योजनेचा फाॅर्म पाठवलेला आहे, त्याची झेरॉक्सवरुन प्रिंट काढून फाॅर्म भरावा.

लुटमार करणाऱ्या एंजटांपासून सावधान, कोणालाही पैसे देण्याची गरज नाही.

आपले स्नेही
नानासाहेब श्री शिवाजीराव मोरे,
मा‌.राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य.
मोबा. – 8180853687.

?????‍??‍??‍???